Thursday, 28 May 2020

पुस्तक परीक्षण....
आस्ट्रियामध्ये व्हिएन्ना शहरात एक तरुण जोडपं राहत होत. त्यातला तरुण, नेमकचं शिक्षण पूर्ण होऊन मानसोपचारतज्ञ झाला होता. एक दिवस अचानक पोलीस आले आणि त्यांनी ह्या जोडप्याला कैद केल. पत्नीला वेगळ आणि पतीला वेगळ ठेवण्यात आल. त्यानंतर उभ्या आयूष्यात त्यां जोडप्याची एकमेकां सोबत भेट होणार नव्हती. तो तरुण सतत त्यांना "आमचा गुन्हा काय..? आमची चूक काय..?" विचारत होता. पोलीस एकदम गप्प होते. तरुणाच्या सततेच्या विचारण्याला एक पोलीस वैतागला. त्याने त्या तरुणाच्या एक थोबाडीत दिली. व म्हणाला, 

"साल्या... चूप बसतो कि नाही..? तुझी एकच चूक आहे कि तू "ज्यू" आहेस." 

अर्थात, हा काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. त्याला पकडुन हिटलरच्या छळछावणीत नेण्यात आलं. आपण, जे कल्पनेतील नर्क म्हणतो ना.. छळछावणी म्हणजे नर्काचीच पृथ्वीवरिल शाखा म्हणायला काहीच हरकत नाही.

एका मोठ्या टेम्पोमध्ये त्या तरुणासारखे इतर असंख्य ज्यू लोकं कोंबून-कोंबून छळछावणीत आणल्या जात असे. ईथे आल्यावर त्यांच्याजवळ असलेले सर्व साहित्य तेथील पोलीस स्वत:घेत असत. आणि ह्या कैद्यांना एक बूट व एक  ड्रैस देत असत. आता तो ड्रेस व बुटही, हल्ली कैद्यांना देतात तसा नवा-कोरा वगैरे नाही. तर या अगोदर जे कैदी छळछावणीत मरण पावले, त्यांच्यापैकी ज्याचा ड्रेस, बुट चांगला, तो ह्यांना वापरायला देत असत. चांगला ड्रेस व बुटं म्हणजे कसा..?? तर, तो फक्त घालता येईल असा. त्यावर जून्या कैद्याच्या रक्ताचे, लाळीचे, पू चे डाग असे. ते जागोजागी फाटलेले असे. असेच ड्रेस व बुटं हे उत्तम समजून त्यांना वापरायला देत असत.

जेवण्या करिता रोज सकाळी एक पाव दिला जाई. दिवसभर फक्त एक पाव..!!  नंतर पूर्ण दिवसभर काहीही नाही. नंतर फक्त काम करुन घेतल्या जाई. काम करतानाही पोलीसाच्या मनात आले कि, चूक असो- नसो, पाठीवर चाबकाचे फटके दिले जाई.

ह्या कैद्यांना छळछावणीत आल्यावर कुठलेही पूर्वाश्रमीचे नावं रहात नसत. प्रत्येकाला एक स्वतंत्र्य नंबर दिला जाई. ते जिंवत असेपर्यंतची तो नंबर हिच त्यांची ओळख.! अपूरे जेवण व अतिश्रमाने हे लोक थोड्याच दिवसात खंगून दात. काही दिवसांनी फक्त हाडाचा सापऴा तयार होत. अशा रोगी कैद्यापैकी, रोज सकाऴी 1500 कैदी बाजूला काढले जायचे. त्या 1500 कैद्यांना, आता गावाबाहेर असतात ना वेअरहाऊस, तशा इमारतीत कोंडल्या जाई. त्या ईमारतीला चेंबर म्हणल्या जाई. त्या ईमारतीला मुख्य द्वाराशिवाय कुठलीही खिडकी नसायची. खिडकीतर दुर, साधी फट किंवा छिद्रही नसायच. अशा चेंबरमध्ये हे 1500 लोक कोंबले कि त्यात विषारी गँस सोडल्या जायचा. व कैद्याना तडफडुन तडफडुन मारल्या जायच.

ज्यांचा नंबर आला नाही,  अशा हाडामासाच्या सापऴ्यांना  रस्त्यावरिल बर्फ दुर करायला, रेल्वेरुळ अंथरायला, रस्त्यातील झाडं तोडायला, पुलाचे पाईप ओढायला किंवा अशाच अतिश्रमाच्या कामाला जुंपले जायचे. हे विकासाचे काम का केले जायचे..? तर अजून जास्तीच्या "ज्यू" लोकांना, छळछावणीमध्ये पोहचायला सोप्प जावं म्हणून.. ! 

जे सकाळी चेंबरमध्ये गेले ते मरुन मोकळे व्हायचे. जे जिंवत असायचे ते जिंवतपणी मृत्यू अनुभवायचे.

तरिही, जिंवत असलेले कैदी फक्त "आजच्या दिवसतरी आपला नंबर टळला" म्हणून त्यातल्या त्यात खुश असायचे. 

मळके गलिच्छ कपडे, अपूरे जेवण, सततचा छळ, प्रियजनांची आठवण, व अंधकारमय भविष्य ह्यामुळे काही कैद्याना नैराश्य यायचे. अन् आत्महत्या करावी वाटायची. पण, आत्महत्या करायला सर्वात आवश्यक काय आहे..?? दोरी..? चाकू..?? हिंम्मत..?? हे सर्व ते कैद्यी उपलब्ध करु शकत होते. तरी ते आत्महत्या करु शकत नव्हते. कारण सर्वात आवश्यक होता तो "एकांत"..! त्यांना तो  मिळत नसे. दिवसा त्या कैद्यावर सदैव पहारा असायचा. व त्या पहाऱ्याकऱ्याच्या नजरेत कोणी आत्महत्या करताना निदर्शनास आल, तर तो त्या कैद्याला, सर्वासमोर एवढ्या वेदना देऊन मारायचा कि बाकीच्या कैद्याला "चेंबर" मधील मरणच बरं वाटायचं. दिलेल्या झोपडीवजा रुममध्ये आत्महत्या करावी तर, पहिले कोण आत्महत्या कऱुन ह्या नर्कातून मोकळे होणार ह्यासाठी तिथे मारामाऱ्या व्हायच्या. एवढे जीवन जगणे कठीण होते.  

कोणी कैदी पळून जाऊ नये म्हणून, त्या छळछावणीला तारेचे कुंपण होते. व त्या तारेमध्ये अतिउच्चदाबाचा विद्युतप्रवाह सोडलेला होता. एकदा, एक-दोन कैदी पळून जाण्यासाठी त्या कुंपनाकडे गेले. आणि काही क्षणात जळून खाक झाले. त्या जळालेल्या कैद्याना पाहुन बऱ्याच कैद्याना आनंद झाला. आनंद कशाचा..? ते कैदी मेले, नरकयातना मधून सुटका झाली, ह्याचा..? नाही..! तर आत्महत्या करुन जीवन संपवायला अतिशय सुलभ मार्ग सापडला..! दुसऱ्या दिवसापासून खूप कैदी, सरऴ तारेवर जाऊन पडायचे व क्षणात जीवनयात्रा संपवायचे. शेवटी अशी आत्महत्या करण्याऱ्यांची संख्या वाढत असल्याने, त्या तारातील विद्युतप्रवाह काढुण टाकण्यात आला. हा हिटलरच्या विरुद्ध "ज्यू" चा एकमेव विजय होता.

एक गंमत म्हणजे, जे पहारेकरी ह्या कैद्यांना यातनाद्यायचे, छळायचे हे सुद्धा "ज्यू" च होते. जे कैदी धिप्पाड असायचे अशांना ह्या कामी लावले जायचे. सुरवातीला हिटलरच्या धाकाने ते कैदी पहाऱ्याकऱ्याच काम नाईलाजाने करायचे. नंतर, इतर साध्या कैद्याच्या यातना पाहुन हेच काम बरं आहे, म्हणून त्यांनी ते स्वीकारल.. व नंतर नंतर ते स्वत: आपणही ज्यू आहोत, आपलाही अंतही ह्या कैद्यासारखाच होणार, सापळा झाल्यावर आपलाही अंत काही वेगळा होणार नाही, हे ते विसरुन जाऊन, ते हिटलरची इमानेइतबारे सेवा करायचे.

अशा, ह्या छळछावणीत तो तरुण आणल्या गेला. पण, तो मानसोपचार तज्ञ असल्याने, व त्याच्या अंगी सदैव सकारात्मक विचार करण्याची सवय असल्याने  "कठीण समयी मनुष्य कसा वर्तऩ करतो..? जीवन मृत्यूच्या दारात मनुष्य कसा वागतो .? ह्याचा अभ्यास करण्यासाठी, ह्यापेक्षा चांगली जागा जगात कुठेही नाही" असा विचार करुन त्याने अभ्यास सुरु केला. तेथील कैद्यांच, पहारेकऱ्यांच, पोलीसांच तो बारकाईने निरीक्षण करु लागला. तेथील नैराश्य आलेल्या बऱ्याच कैद्यांमध्ये त्याने जीवन जगण्याची ईच्छा जागृत केली. त्यांना बळ दिलं. 

"ज्याला का जगायचे हे कळले तो कशाही परिस्थितीत जगू शकतो."

 हे वाक्य आहे महान मानसोपचार तज्ञ "व्हिक्टर फ्रँन्कल" ह्यांच. आणि तो तरुण कैदी दुसरा कोणी नसुन "डाँ  व्हिक्टर फ्रँन्कल" हेच होते.

डाँ  व्हिक्टर फ्रँन्कल ह्यांनी छळछावणीतले लिहलेले अनुभव, तेथील कैदी, पहारेकरी, पोलीस ह्या सर्वाचा मानसशास्त्रीय अभ्यास करुन "अर्थाच्या शोधात" हे पुस्तक लिहले आहे. व ते जगातील जवळपास सर्व भाषेमध्ये अनुवादित झालेले आहे. 

त्या छळछावणीत, आपल्या दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर जे काही मोजके लोकं जिंवत राहीले त्यात डाँ व्हिक्टर फ्रँन्कल हे एक होते. ते केवळ जिंवत राहीले नाही तर त्यांनी त्याचा अभ्यास करुन जवळपास 32 पुस्तकामधून त्यांच विश्लेषण केल. व त्यांच्यामुळेच, छळछावणीतील छळ जगासमोर येऊ शकला.

सर्वांनी ह्या लाँकडाऊनच्या काळात वाचावेच असे हे पुस्तक..! कोरोना हे मोठे संकट आहे हे खरं आहे. पण, त्यातूनही आपण बाहेर निघण्यासाठी, आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सकारात्मक असण गरजेच आहे.  आणि असे सकारात्मक विचार येण्यासाठी हे पुस्तक नक्किच उपयोगी पडेल..!  नक्कि वाचा..!!

Thursday, 21 May 2020


अ. क्र. घटकाचे नाव डाउनलोड
1. घटकाचे नाव टाका क्लिक करा
2. घटकाचे नाव टाका क्लिक करा
3. घटकाचे नाव टाका क्लिक करा
4. घटकाचे नाव टाका क्लिक करा

Sunday, 17 May 2020

सुस्वागतम

Teacher 4 You  Blog वर आपले सहर्ष स्वागत आहे. 


घरी रहा.सुरक्षित रहा.  
चला रोगप्रतिकारक शक्ती वाढवूया ....
किमान ७ ते ८ तास झोप घ्या .
किमान ३० मिनिटे योगासने व हलका व्यायाम करावा 
घरात येण्यापूर्वी /बाहेरून आल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुवून घरात प्रवेश करावा .
आनंदी राहा.सकारात्घमक विचारांचा अंगीकार करा.

सेवन  
 वेळेवर सकस आहार घ्या 
ज्यामध्ये मोड आलेली कडधान्ये,डाळ,दुध ,अंडी,मांस,मासे इ.प्रथिनयुक्त आहार घ्या.
वेळोवेळी संत्री,लिंबू आवळा यांचा वापर करा.